बाणेर , २४ जुलै २०२५ –
भारतीय टपाल विभाग आणि बाणेर पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. ज्योती गणेश कळमकर (माजी नगरसेविका, पुणे मनपा) आणि श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर (सरचिटणीस, भाजपा पुणे शहर) यांच्या प्रयत्नांतून बाणेर येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “आपले आधार, आपली ओळख, आपला अधिकार” या घोषवाक्याखाली हे शिबिर नागरिकांना आधार-संबंधित महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देईल.
या शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण, १८ वर्षांखालील मुलांसाठी नवीन आधार नोंदणी आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे या सेवा उपलब्ध असतील.
हे शिबिर सर्वे नं. ८७, भाजपा जनसंपर्क कार्यालय, श्री गणेश मंदिरा शेजारी, बाणेर, पुणे-४११०४५ येथे आयोजित करण्यात आले आहे. २४ ते २६ जुलै २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.
भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी सर्व नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी ७०५७९९२४२४ किंवा ७५१७९९२४२४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी