बालेवाडी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, 22 जुलै 2025 रोजी बालेवाडी, बाणेर तसेच पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस आणि महाळुंगे गावातील महापालिका शाळांमध्ये मोफत शालेय बॅग वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे 6000 विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा उत्तम बालवडकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष समिर भाऊ चांदेरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालेवाडी येथील कै. बाबुराव शेठजी गेणूजी बालवडकर मनपा शाळा आणि बाणेर येथील कै. सोपानराव बाबुराव कटके प्राथमिक विद्यालय मनपा या शाळांमध्ये तसेच सुस व महाळुंगे येथील मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पै. दिनकर बालवडकर, श्री. दिलीप बा. बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, माणिक तात्या गांधीले, मनोज बालवडकर पाटील (कार्याध्यक्ष रा.यु.काँ.पार्टी पुणे), शाळेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम व वाघमारे मॅडम, ह.भ.प. हरिभाऊ बालवडकर, शशीभाऊ बालवडकर, पो. पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर, अशोक गुलाब बालवडकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.




More Stories
बालेवाडीतील 1 कोटी रुपये खर्चून बांधलेली भाजी मांडई बंद का? — नागरिकांकडून उत्तरदायित्वाची मागणी, जयेश मुरकुटे यांचा जनआंदोलनाचा निर्धार
बाणेर मुळा नदी घाटावर छठ महापर्व उत्साहात साजरा — डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात शेकडो उत्तर भारतीय बांधवांची उपस्थिती
बालेवाडीतील छठ पूजेत श्रद्धा, आस्था आणि उत्साहाचा संगम.. अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी व अरविंदकुमार सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन