October 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल शाळेत विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ आणि शपथविधी सोहळा शिस्तबद्धतेने पार पडला

पिरंगुट (प्रतिनिधी) २६ जुलै –

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे विद्यार्थ्यांची विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर नुकताच विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ आणि शपथविधी (Investiture Ceremony) मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

 

या कार्यक्रमात शाळेच्या संचालिका सौ. रेखा बांदल व संचालिका कु.शिवानी बांदल यांनी नव्याने निवडून आलेल्या कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, डिसिप्लिन कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन, हाऊस कॅप्टन, हाऊस व्हाईस कॅप्टन यांना सन्मानपट्टा (सॅश) आणि बॅजेस प्रदान करून त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी जबाबदारीची शपथ घेतली आणि शाळेप्रती निष्ठा राखण्याचे वचन दिले.

या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल यांचे मार्गदर्शन लाभले. संचालिका सौ. रेखा बांदल व संचालिका कु. शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, जबाबदारी आणि सेवाभाव याचे महत्त्व पटवून दिले आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.शाळेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “चांगले नेतृत्व म्हणजे केवळ पुढे जाणे नाही, तर इतरांना बरोबर घेऊन प्रगती करणे होय. विद्यार्थी परिषद ही शाळेच्या संस्कृतीचे प्रतिक असून शिस्त आणि मूल्यांची पायाभरणी यामधून होते.”.

या प्रसंगी शाळेच्या संचालिका कु. शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर जबाबदारीसह सेवा करण्याची भावना असली पाहिजे.” पालकवर्गानेही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “पदग्रहण समारंभ हा खूप आनंददायक सोहळा होता. या समारंभामुळे मुलांमध्ये नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना विकसित झाली.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्रायमरी विभाग प्रमुख सना इनामदार तसेच प्रायमरी विभागप्रमुख पल्लवी नारखेडे व ऋग्वेद हाऊसच्या शिक्षिकांनी उत्तम प्रकारे केले होते. शाळेचे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि आत्मविश्‍वासाने भारलेले होते – जणू नव्या नेतृत्वाची पाऊले भविष्याच्या दिशेने निश्चयाने पडत होती.