सांगवी :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे आज एक विशेष आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. प्रो कबड्डी लीग सीजन १२ मधील सुप्रसिद्ध संघ पटना पायरेट्सने महाविद्यालयाला भेट दिली. या दौऱ्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी आणि खेळाविषयीचा उत्साह अधिकच वाढला.
या खास भेटीत आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षक माननीय अनुप कुमार, असिस्टंट कोच प्रशांत कुमार राय, तसेच नामवंत रेडर मनिंदर सिंग यांच्यासह संपूर्ण संघाने सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना कबड्डीतील अनुभव, कठोर प्रशिक्षणाची गरज, शिस्तीचे महत्त्व यासंदर्भात मार्गदर्शन केले.
संघातील खेळाडूंनी मैदानात विद्यार्थ्यांबरोबर काही खेळदृश्य सादर करत प्रात्यक्षिकेही दाखवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली व त्यांनी या क्षणांचे भरभरून स्वागत केले.
महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली असून भविष्यातील खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांची दिशा मिळवून देणारी ठरली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी