बालेवाडी :
महाराष्ट्राचे लाडके आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड विधानसभा (उत्तर मंडल) येथे “महारक्तदान संकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, एकूण १०१४ रक्त पिशव्या (युनिट्स) संकलित करण्यात यश आले.
या यशाबद्दल भाजपा कोथरूड विधानसभा (उत्तर मंडल) चे अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत “सेवा हाच धर्म” ही भावना प्रत्यक्षात उतरवत हजारो जीव वाचवण्यासाठी हातभार लावल्याबद्दल कौतुक वाटते. हे केवळ रक्तदान नसून, जबाबदारी, माणुसकी आणि एकतेचे प्रतीक असल्याचे बालवडकर यांनी नमूद केले. या यशाचे श्रेय रक्तदात्यांच्या सहभागाला, प्रेमाला आणि मनापासून दिलेल्या योगदानाला असल्याचेही त्यांनी सांगितले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आपल्या परिसरातील भाजपा माजी, नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, भाजपा कोथरूड उत्तर मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वांच्या संघटित प्रयत्नामुळे हे शिबिर यशस्वी झाले.
यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पुणे शहर महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी विशेष उपस्थिती लावून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, भाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर,माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर,माजी नगरसेवक अमोल बालवडकर,भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, पुनीत जोशी,राघवेंद्र बापु मानकर,रविंद्र साळेगावकर,सुशिल मेंगडे,कोथरूड उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, आणि अस्मिता करंदीकर,अनिकेत चांदेरे, राहूल कोकाटे, रोहन कोकाटे, शिवम सुतार, सचिन सुतार,प्रमोद कांबळे सुशिल सरकाटे,सुभाष भोळ, लखन कळमकर,डॅा.आनंद जराड,नवनाथ ववले,काळुराम गायकवाड,चंद्रकांत जाधव,अमोल पाटील,अर्थव देवरे,शरद भोते, सुहास भोते, गजानन चांदेरे, शिवम बालवडकर,हेमंत कळमकर, बालाजी मुळे, कृष्णा शर्मा, कबीर कदम महिला पदाधिकारी उमा गाडगीळ, वैदही बापट,प्रियंका पेंडसे, कल्याणी टोकेकर, निकिता माथाडे, जागृती विचारे, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, मीना पारगावकर, सुजाता धनकुडे,स्नेहल चौगुले, वैशाली कमाजदार,प्राजक्ता देवस्थळी,विजया चांदोलकर,मोसंबी बकोरे,सविता जाधव, रेखा कश्यप,पायल मुरकूटे,प्रगती निसाळ,अर्चना देशपांडे,राणी मोहिते,मानषी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले