November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील पल्लाडियन सोसायटीत शिवम बालवडकर यांच्या वतीने नागरिक सुविधा केंद्राचे आयोजन – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बालेवाडी :

आज बालेवाडी येथील Palladion सोसायटीत भाजपा युवा मोर्चा पुणे शहराचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने नागरिक संवाद व नागरिक सुविधा केंद्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमास सोसायटीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय सेवा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या सुविधांच्या माध्यमातून नागरिकांसाठी पुढील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या:

📍 आधार कार्ड अपडेट

📍 नवीन पॅनकार्ड

📍 नवीन मतदान नोंदणी

📍 रेशनकार्ड

📍 विवाह नोंदणी प्रमाणपत्र

📍 भाडेकरार नोंदणी

📍 पासपोर्ट सेवा

📍 रहिवासी दाखला

या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत धावपळ न करता सोसायटी परिसरातच सुविधा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

“नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळवण्यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांत चकरा माराव्या लागतात. त्यात वेळ, श्रम आणि पैसे या तिन्हींचा अपव्यय होतो. हे ओळखूनच आम्ही नागरिकांच्या दारातच सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतला. Palladion सोसायटीतील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून ऊर्जा मिळाली आहे. भविष्यात इतर सोसायट्यांमध्येही असे उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे.” – शिवम बालवडकर (उपाध्यक्ष : युवा मोर्चा भाजप पूणे शहर)

हा उपक्रम प्रियंका शिवम बालवडकर (सदस्य, भाजपा) यांच्या सहकार्याने पार पडला.