October 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर मंडळाचे अध्यक्ष हनुमंतभाऊ गावडे यांचा राहुल बालवडकर यांच्या वतीने सत्कार

बालेवाडी :

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, मा. पै. हनुमंतभाऊ गावडे यांचा बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात आज सत्कार करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने, तसेच गावातील ज्येष्ठ पैलवान आणि नागरिकांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.

 

यावेळी बोलताना राहुल दादा बालवडकर यांनी बालेवाडी गावाला कुस्तीची गौरवशाली परंपरा असल्याचे नमूद केले. मा. पै. हनुमंतभाऊ गावडे हे आपल्या अनुभवातून कुस्ती क्षेत्राला आणखी उंचीवर नेतील अशी खात्री आहे. बालेवाडी गावाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा

या वेळी ज्येष्ठ पै. दिनकर आप्पा बालवडकर, प्रकाश तात्या किसन बालवडकर, मा. सरपंच अंकुश बालवडकर, हनुमंत बालवडकर, पी. सी. एम. टी. मा. चेअरमन दिलीपभाऊ बालवडकर, पै. राजू ना. बालवडकर, शशीभाऊ बालवडकर, पै. विष्णू बालवडकर, दिलीप शेठजी बालवडकर, बबन हगवणे, ज्ञानोबा भाऊ बालवडकर, हनुमंत बाबुराव बालवडकर, अशोक गुलाब बालवडकर, उमेश सत्रे, नरेंद्र बालवडकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.