पाषाण :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण यांच्या वतीने एक भव्य आरोग्य तपासणी, रक्तदान आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, नेत्रतपासणी करून अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच, मानवतेच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाबाबत बोलताना माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण म्हणाले की, “मा. अजितदादा पवार यांच्या समाजकल्याणाची आणि लोकसेवेची प्रेरणा आम्हाला मिळते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजन करून नागरिकांच्या सेवेसाठी काहीतरी उपयुक्त करावे, हीच भावना होती. नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद हेच या उपक्रमाचे यश आहे.”
या आरोग्य शिबिरामुळे अनेक नागरिकांना तात्काळ तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध झाली असून, स्थानिक स्तरावर हे उपक्रम उपयुक्त आणि स्तुत्य ठरले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी