September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील आरोही चोंधेची आंतरराष्ट्रीय तायक्वांदोमध्ये चमकदार कामगिरी; रौप्य आणि कांस्य पदकांवर कोरले नाव!

बाणेर:

डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, बाणेर येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आरोही मंगेश चोंधे हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत रौप्य (सिल्वर) आणि कांस्य (ब्रांझ) पदके पटकावून भारताचा आणि शाळेचा गौरव वाढवला आहे.

 

दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स तायक्वांदो स्पर्धेत आरोहीने ‘पूमसे’ प्रकारात कांस्य पदक, तर ‘फाईट’ प्रकारात रौप्य पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशामागे प्रशिक्षक राजेश पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलचे प्राचार्य आणि शिक्षकांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.

गेली आठ वर्षे आरोही तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असून, तिला या खेळाची प्रचंड आवड आहे. तिच्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांचे आणि मेहनतीचे फळ तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून मिळाले आहे. याआधीही तिला कलमाडी शाळेची क्रीडा क्षेत्रातील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ (बेस्ट प्लेयर) म्हणून ट्रॉफी मिळाली आहे. विशेष म्हणजे, तिने २०२५ मध्ये ब्लॅक बेल्ट डॅन टू (Black Belt Dan Two) ची परीक्षाही दिली आहे.

आरोहीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळा आणि परिसरातून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.