February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस  सौरभ कुंडलिक यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा!

औंध :

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांनी औंध येथे मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस अनोख्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला.

या विशेष कार्यक्रमात, पोलिस बांधवांसाठी रेनकोट वाटप आणि महिलांना शिलाई मशीनचे वाटप असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. सौरभ कुंडलिक यांच्या वतीने आणि वूमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सौरभ कुंडलिक म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.” तसेच, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत, त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. वूमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा पियुषा पवार यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नसून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा एक प्रयत्न होता. सुरक्षितता आणि स्वावलंबन या दोन महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करत, सेवा, सन्मान आणि सशक्तीकरणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सौरभ कुंडलिक यांनी यापुढेही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी वूमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या पियुषा पवार, किशोर कुवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) नेते रमेश ठोसर, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, स्वीकृत सदस्य वसंत जुनवणे, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पाटील, भाजप पदाधिकारी सागर मदने, सागर परदेशी, शशिकांत नाईक, अविनाश लोंढे, योगेश नाईक, बालाजीत सिंग पोतवाल, आकाश ढोणे, शंकर म्हेत्रे, नागेश संघशेती, गणेश कोळी, इरफान शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.