December 3, 2024

Samrajya Ladha

बाणेर रस्त्यावरील चेंबरचे झाकण तुटले, दुर्घटना टाळण्यासाठी मनसेचे अनिकेत मुरकुटे यांनी प्रशासनाच्या मदतीने करून घेतली दुरुस्ती.

बाणेर :

बाणेर मेन रोड वरील चेंबर चे झाकण तुटलेलं निदर्शनास आल्यानंतर तात्काळ मनसेचे उपविभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे यांनी मनपा प्रशासन व पत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने दुरुस्त करून घेतले.

बाणेर मेन रोडवरील चेंबर चे झाकण जड वहणांमुळे खचलेले निदर्शनास आले. यामुळे वाहन चालक अथवा नागरिकांना त्रास होऊ शकतो व एखादी दुर्घटना उद्भवू शकते म्हणून यावर तातडीने मनपा प्रशासनाला व पथ विभागाच्या अधिकार्यांना त्याची तक्रार दिली. तातडीने त्यावर उपाययोजना करुन स्वतः प्रत्यक्ष जागेवर थांबुन अधिकारी व कर्मचार्यांसमवेत चेंबर दुरुस्तीचे काम करण्यात आले – अनिकेत मुरकुटे (उपविभागअध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)