March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील शिवरायांच्या स्मारकासमोरील भागात कचरा टाकणाऱ्यांनी कचरा टाकणे त्वरित थांबवावे

बाणेर :

बाणेर येथे शिवरायांचे सुंदर स्मारक स्वराज्य प्रतिष्ठान ने नागरिकांच्या सहभागातून उभे केले असुन येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास नमन करूनच पुढे जाते. या स्मारकामुळे बाणेर गावची शोभा वाढलेली आहे. अशा सुंदर व संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील भागात कचरा टाकून या परिसराची शोभा मलिन करत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ दिसत असून तिथे दुर्गंधी पसरत आहे.

बाणेर परिसरातील व परिसराबाहेरील सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक येथे आवर्जून भेट देत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करीत दर्शन घेऊन पुढे जातात. अशा या महत्त्वाच्या ठिकाणी अस्वच्छता करण्यास काही लोक मागे पुढे पाहत नाही हे दुर्दैव आहे.

शिवरायांच्या स्मारकासमोर आपण कचरा टाकतोय याचा विचार एक सुजाण नागरिक म्हणून कचरा टाकणाऱ्याने करावा. आपले आराध्य दैवताचे स्मारक आहे याचे भान ठेवायला हवे. गावातील नागरिकांनी चुकीच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्ती दिसल्यास त्यांस त्वरित समज द्यावी अशी विनंती – शिवभक्त अक्षय मुरकुटे