October 18, 2024

Samrajya Ladha

शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार बाजारसमितीचे काम चालावे म्हणून मांजरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन..

पुणे :

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी यांच्या अंतर्गत असलेले मांजरी उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा, रस्ता रोको, आंदोलन झाले. या वेळी महत्त्वाची मागणी या ठिकाणी अनेक दिवसापासून करण्यात येत होती, की मार्केटमधील खोतेदार, व्यापारी, दुबार विक्रेते, यांना बाहेर काढून, शेतकऱ्यांच्या मालाची विक्री सुरळीत व्हावी. यासाठी आंदोलन करण्यात आले

ज्या हेतूने मार्केटची उभारणी झालेली आहे, शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार चालणाऱ ती चालू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी गेले अनेक दिवसापासून आंदोलन चालू होते. आज ह्या आंदोलनाचा उद्रेक पुणे सोलापूर रोड वरती पाहण्यात आला. या दहा दिवसात बाजार समितीचे संचालक श्री सुदर्शन चौधरी व रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत काळभोर इतर अनेक शेतकरी संघटना सामाजिक संघटना मराठा महा समाज अशा विविध संघटनांनी या लढ्याला जोरदार ताकद दिली होती.

या आंदोलनात विशेषता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, दिलीप बालवडकर सामाजिक कार्यकर्ते उमेश सत्रे उपाध्यक्ष वाहतूक संघटना, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव बालवडकर पूर्णपणे ताकद लावून रस्त्यावर उतरलेले होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रशासन यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर. प्रदेश उपाध्यक्ष यांच्या कडे शेतकऱ्यांच्या मागनी पूर्ण करणारे जबाबदारीचे लेखी स्वरूपातील पत्र देऊन पुढील पंधरा दिवसाच्या मुदतीची वेळ घेऊन सदरील व्यापारी खोतेदार दुबार विक्री करणारे व्यापारी, यांना बाहेर काढण्याचे लेखी आश्वासन दिले. नंतरच सदरचे आंदोलन हे मागे घेण्यात आले .

याप्रसंगी सभापती माननीय दिलीप काळभोर ,संचालक .श्री राजाराम कांचन, श्री रवींद्र कंद, श्री नानासाहेब आबनावे, श्री सुदर्शन चौधरी, श्री रोहिदास उंद्रे ,व प्रशासनाचे सचिव श्री दौंडकर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सूर्यकांत भाऊ काळभोर,, श्री सुदर्शन चौधरी, संचालक ..इतर सर्व पदाधिकारी शेतकरी बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत सदरील मागणीचे पत्र देण्यात आले व शेतकऱ्यांना विश्वास घेऊन सदरील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली व पुढील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सदरील आंदोलन थांबवण्यात आले.