April 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न..

बाणेर :

हनुमान जन्मोत्सवानिमित्त बाणेरमध्ये शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा असलेली बगाड यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून, गावकऱ्यांच्या श्रद्धेचा, एकतेचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे, जो पुढील पिढीसाठी जपला जात आहे.

 

हनुमान जयंतीच्या शुभदिनी बाणेर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. या बगाड उत्सवात हजारो भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

उत्सवाची सुरुवात गावचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून झाली. वाजत गाजत, पारंपरिक वाद्यांच्या गजरात बगाड पुढे सरकत होते. कपिल मल्हार सोसायटी समोर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत बगाडचे रिंगण पार पडले. या विलोभनीय दृश्याचा अनुभव घेण्यासाठी हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाणेर ग्रामस्थ आणि श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.