बालेवाडी :
भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली लहू बालवडकर सोशल वेलफेअर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर आणि गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय “योगोपचार” आरोग्य शिबिरास पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
बालेवाडी येथील गेनबा सोपानराव मोझे कॉलेज मैदानावर तीन दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा रोज २०० ते २५० नागरिक लाभ घेत होते. यानुसार या “योगोपचार” शिबिरात तीन दिवसात ७०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराचे नेतृत्व योग गुरु तथा योगोपचार तज्ज्ञ श्री राम खांडवे गुरुजी यांनी केले, तर विशेष मार्गदर्शन डॉ. श्री. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले.
शिबिरामध्ये पाठीच्या मणक्याचे आजार, मधुमेह व रक्तदाब यांसारख्या आजारांवर योग आधारित उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी उपचारानंतर अनुभवलेल्या सकारात्मक बदलांची माहिती देताना आयोजकांचे आभार सुद्धा मानले.
या शिबिरात विनामूल्य प्रवेश असल्याने विविध वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणात युवक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी “योगोपचार” शिबिरासाठी नाव नोंदणी केली होती.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन लहू गजानन बालवडकर व योगतज्ञ प्रमोद जोशी यांच्या पुढाकाराने पार पडले. त्यांनी सांगितले की, “शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत योगसाधना अंगीकारावी, यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार आहे.”
More Stories
मुळा नदी किनारा आणि सोंडमळा देवराई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आणि पर्यावरणप्रेमींचा एकत्रित लढा; वनविभाग आणि महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद..
बालेवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव निमित्त पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; रंगणार निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाडा..
सुसगाव येथे रंगणार कुस्तीचा थरार श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ निमित्त भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांची जंगी आखाडा..