April 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये समीर चांदेरे यांची राहूल आर्कस सोसायटीमधील नागरिकांशी थेट भेट; समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन

बाणेर :

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चंदेरे यांनी नुकतीच बाणेर येथील राहूल आर्कस सोसायटीमधील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा केली.

 

या बैठकीत पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापनातील अडचणी, कचरा उचलण्याची अनियमितता आणि सार्वजनिक जागेचा योग्य वापर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय झाला. नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या, ज्याला समीर चांदेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील थेट संवादच कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी पोहोचून त्यावर प्रभावी उपाय शोधण्याचा मार्ग उघडतो. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांशी त्वरित पाठपुरावा करून या समस्यांवर लवकरच योग्य तो तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्नशील राहील..
समीर चांदेरे (युवक अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

You may have missed