September 8, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड, पिरंगुट, कोळवण, माले, बावधन व सूस अशा सर्व शाखांमध्ये दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.

 

विद्यार्थ्यांनी फेटे घालून व पारंपरिक लेझीम व ढोल ताशाच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पालखीतून महाराजांच्या मूर्तीला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सिहंसनावर विराजमान करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक शिवमुर्ती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून व महाराजांची आरती करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्रजी बांदल सर, दीपक सोनावणे, सचिन केदारी आदी मान्यवरांसमवेत पौड ब्रांच च्या इन्चार्ज प्राजक्ता वाघवले तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

शाळेच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व शिवभक्त विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पालखीचे व मान्यवारांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत केले . शिवगर्जना देऊन शिवरायांची व मावळ्यांची वेशभूषा केलेले बाळशिवाजी यांचा पाळणा, पोवाडा, शिववंदना आदी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शिवाजीमहाराजांचा इतिहास उलगडला. अतिशय सुंदर सजावट करून किल्ल्याची प्रतिकृती उभारून त्यात वेशभूषा केलेले शिवाजी महाराज विराजमान झाले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय रोचक व मनाला भावेल असे व सगळ्यांना रुचेल असे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ स्थापित करून प्रत्येकाची कार्यें समजावून सांगितली व त्याकाळी सुद्धा शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन किती चोख होते याची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे देऊन शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे दरवळत सगळे वातावरण शिवमय केले. यावेळी नुकत्याच झालेल्या क्रीडास्पर्धेच्या निमित्ताने व इतर उपक्रमांमध्ये प्रविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी शिवाजी महारांचे व्यवस्थापन, त्यांची शिस्त,त्यांची विश्वासहर्ता, जनतेला जाणणारा जाणता व नेणता राजा त्यांचे वर्तन या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलेल्या राज्यात कायम एकी राहिल असे प्रतिपादन करत शिवाजी महाराजांचा एक तरी गुण घेण्याचा प्रयत्न प्रत्येकानी केला तर महाराष्ट्र राज्यात सर्वगुण संपन्न पिढी घडण्यास वेळ लागणार नाही असा मोलाचा संदेश सर्वांना त्यांच्या भाषणातून दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संस्थापिका सौं रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. इन्चार्ज प्राजक्ता वाघवले व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने शिवजयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पध्तीने संपन्न झाला. कार्यक्रमांची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करण्यात आली.