April 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..

पुणे :

नांदे गावच्या विद्यमान सरपंच निकिता शेखर रानवडे यांची पुणे जिल्हा राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या युवती कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना जिल्हाधक्ष जगन्नाथबापु शेवाळे यांच्या हस्ते, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सहिनीशी निवडीचे पत्र देण्यात आले.

 

निकिता रानवडे या पवार साहेबांच्या सदैव बरोबर असलेल्या निष्ठावान परिवारतील असुन रानवडे यांनी अल्पावधीत केलेली कामे, राष्ट्रवादी पक्षाशी असलेली निष्ठा, उच्चशिक्षीत, उत्कृष्ट वक्तेपणा, समाज्याप्रती काम करण्याची आवड या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पक्षाने हि जबाबदारी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व युवतींना संघटीत करुन साहेबांचे व ताईंचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असल्याचे व युवतींचे संघठन करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुन युवतींचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार : निकिता शेखर रानवडे(सरपंच नांदे गाव)

यावेळी जिल्हाधक्ष जगन्नाथबापु शेवाळे, आमदार अशोकबापु पवार, पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, महिला अध्यक्ष भारती शेवाळे ,युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, बारामती लोकसभा अध्यक्ष महादेव कोंढरे, सविता दगडे, दगडु करंजावणे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.