पिरंगुट :
पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पिरंगुट शाखेत आज विज्ञानदिना निमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पिरंगुट ग्रामपंचायतिचे माजी उपसरपंच मा. श्री. राहुल पवळे तसेच शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमा नंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांनी कुतुहलाने सर्व प्रयोग पाहिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना प्रश्न विचारून त्यांनी प्रयत्न पूर्वक तयार केलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली.
इयत्ता पहिली पासून ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग निहाय गट करून आपल्या विज्ञान पुस्तकावर आधारित विविध प्रकल्प आपापल्या शास्र शिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि लहान मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने केले. त्याच्या माहिती सांगण्याचे प्रात्यक्षिक २ दिवस सराव करून आपले प्रदर्शन जास्तीत जास्त चांगले कसे होईल यासाठी सर्वांचीच खूप प्रयत्न केले. सुमारे ४८० प्रकल्पांचा सहभाग आजच्या प्रदर्शनात होता हे वैशिष्टच म्हणावे लागेल विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी याचा नक्कीच हातभार लागेल.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल ,रेखा बांदल शाळेचे मुख्याधापक डॉ. अभिजीत टकलेयांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शनाचे उत्तम असे नियोजन केले. या मध्ये सोलार एनर्जी ,चंद्रयान,टाइप्स ऑफ ग्रेन्स,दिगेस्डीव सिस्टीम, पाणी शुद्धता प्रकल्प, प्रकाशाचे परिवर्तन, वाहतूक दिवे आणि व्यवस्था, जंक फूड आणि आरोग्यदायी पोषक अन्न, प्राणी सृष्टी आणि वनस्पती अशा अनेक विषयांचा समावेश विद्यार्थ्यांनी आजच्या या प्रकल्पात केला होता. त्याला सर्व शिक्षक तसेच पालकांनीही उत्स्फूर्त दाद दिली.
More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!
शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार बाजारसमितीचे काम चालावे म्हणून मांजरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन..