July 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे चैतन्य गायक कट्टा आयोजित राम नवमी निमित्त ‘गाते रहो बजाते रहो’ कार्यक्रम उत्साहात संपन्न..

बालेवाडी :

चैतन्य गायक कट्टाच्या वतीने राम नवमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या विशेष सहकार्याने ‘गाते रहो बजाते रहो’ या शानदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक येथील संजय फार्म येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर आणि त्यांच्या पत्नी ज्योती राहुल बालवडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

 

राहुलदादा बालवडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल चैतन्य गायक कट्टाचे कौतुक केले आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, “चैतन्य गायक कट्टा हे गाण्याची आवड जपणारे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होतो.”

चैतन्य गायक कट्टा हे विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन आपल्या गायनाच्या आवडीतून आनंदाची निर्मिती करतात. ‘गाते रहो बजाते रहो’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा संगीताची जादू दाखवून दिली, ज्याचा अनुभव घेत उपस्थितांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी वामा वूमन क्लबच्या अध्यक्षा पूनम विधाते, एपीआय ऋतुजा जाधव, आर आर पाटील मॅडम, प्रकाश तात्या बालवडकर, माजी पोलिस पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर यांनीही उपस्थित राहून कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

You may have missed