महाळुंगे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे येथील सोसायटी मित्रपरिवाराने केक कापणे किंवा हार-तुरे घालण्याऐवजी एक अनोखा आणि स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. सारथी आणि जॉर्डिन सोसायटीमधील हाऊसकीपिंग कर्मचाऱ्या महिला भगिनी आणि सुरक्षा रक्षकांना आवश्यक असणाऱ्या चार्जिंग लाईट्स आणि मिठाईचे वाटप समीर चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामुळे आपण भारावून गेलो असल्याचे समीर चांदेरे यांनी सांगितले. ते म्हणाले, “वाढदिवस म्हणजे केवळ सेलिब्रेशन नसून आपल्या माणसांसोबत आनंद वाटण्याची संधी आहे. आणि हेच माणुसकीचं तत्व बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे येथील विविध सोसायट्यांमधील माझा मित्र परिवार जोपासत आहे, जी माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”
यावेळी समीर चांदेरे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, “सोसायटीमधील सुदीप पाडाळे, जार्डिन सोसायटीचे चेअरमन कुणाल काटे, रमेश धनगर, प्रवीण दांगट, पिंपरकर काका, सस्ते काका आणि सोसायटीतील सर्व ज्येष्ठ, मित्रमंडळी या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हा दिवस अधिकच खास झाला. तुमचं आशीर्वाद आणि प्रेम हेच माझं खरं बळ आहे!”
यावेळी युवराज भाऊ कोळेकर, महादेव भाऊ चाकणकर, समीरभाऊ कोळेकर, पांडाभाऊ पाडाळे, मंगेश भाऊ विधाते, हृतिक बालवडकर आणि अक्षय जाधव, ओंकार रणपिसे आदी उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!