August 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे येथील इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न…

महाळुंगे : 

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. त्याच बरोबर कुत्रिम बुद्धिमत्ता याचे ही प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कुत्रिम बुद्धिमत्ता लक्षात घेऊन कौशल्य वाढीच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

 

बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या विद्यालयातील ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलनातील बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले या प्रसंगी पवार बोलत होते. 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, स्पर्धा आयोजक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, क्रीडा आयुक्त शितल तेली-उगले, पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे समिर चांदेरे, पीडीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, कविता आल्हाट, नाना काटे, निर्मला नवले, ज्ञानेश्वर तापकीर, गणपत बालवडकर, रोहिणी चिमटे, विद्यार्थ्यांचे पालक तसेच बाणेर, बालेवाडी सुस व म्हाळुंगे मधील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, सध्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर वाढला असून एआय कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शालेय विद्यार्थ्यांनी एआयचा अभ्यास करावा. राज्य सरकारने कौशल्य विकास आणि एआय प्रशिक्षणकरिता भरीव आर्थिक तरतूद केली आहे. शासनाकडून क्रीडा विभाग आणि खेळाडूंच्या मदतीसाठी कायम सहकार्य केले जाते. काळानुसार शिक्षणाची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचे शिक्षण मिळायला हवे याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. क्रीडा विभागातील विविध प्रलंबित कामांसाठी क्रीडा आयुक्त यांनी २५ कोटींचा प्रस्ताव सादर केला असून यास तात्काळ मंजुरी दिली असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव चांदेरे यांनी तर समीर चांदेरे यांनी आभार मानले.