April 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद……

कृष्णानगर :

योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त योगीराज पतसंस्था व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यास खातेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने याप्रसंगी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, न्यूरो सर्जन निर्मल पाटील, डॉ. संतोष पडवळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा लेखाजोखा यावेळी मांडला. कृष्णानगर शाखेची कर्ज वसुली 99% आहे तसेच संस्थेला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राज्यातील आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे, हे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यापुढे वर्धापनदिनी दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव मुरकुटे, उद्योजक भगवान पठारे, युवा नेते सचिन सानप, संस्थेचे संचालक गणेश तापकीर, रामदास जाधव, दत्तात्रय भापकर, प्रदीप नेवाळे, पांडुरंग कदम, योगेश म्हेत्रे, पांडुरंग सुतार, माजी संचालक खंडू मांडेकर, अमर लोंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका भाग्यशाली पठारे, सीमा डोके, लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी, तसेच संस्थेचे सर्व संचालक व स्टाफ उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते व शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर यांनी केले तर आभार शाखा समिती सदस्य अनिल खैरे यांनी मानले.