March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हिंजवडी फेज 1 येथील सेचुरो टेक्नॉलॉजीज कंपनीमध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

हिंजवडी :

12 जानेवारी रोजी, स्वामी विवेकानंद जयंती हिंजवडी फेज 1 येथील सेचुरो टेक्नॉलॉजीज कंपनीमध्ये साजरी करण्यात आली. सेचुरो टेक्नॉलॉजीज कंपनी ही भारतातील टॉप क्लाउड ओरॅकल नेटसुइट ईआरपी आणि बिलमेड रिटेल पॉइंट ऑफ सेल सॉफ्टवेअर प्रदाता आहे.

यावेळी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांची जीवनकथा वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी तरुणांना सांगितली.

कंपनीचे संचालक दीपक सिंग यांनी सांगितले की, 1999 मध्ये जेव्हा ते 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले शिक्षा नावाचे पुस्तक वाचले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी त्यांना मोठे कार्य करण्यास आणि आपल्या भारत देशाच्या विकासात योगदान देण्याची प्रेरणा दिली. या देशातील प्रत्येक तरुणाने स्वामी विवेकानंदांनी लिहिलेले शिक्षा नावाचे पुस्तक वाचावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी दीपक सिंग, नृसिंह (सागर) आंबेकर, कैलास गर्जे, आशा त्रिपाठी, दुष्यंत तोतलानी, गोविंद प्रजापती, कृष्णा वाडेकर, पांडुरंग गांगुर्डे व इतर कर्मचारी उपस्थित होते.