भूगाव :
पौड पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या मौजे भूगाव येथिल हॉटेल सरोवरच्या शेजारील मानस तलावामध्ये चार चाकी गाडी सह मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पौड पोलीस स्टेशन हद्दीत आज रोजी मौजे भुगाव हद्दीत हॉटेल सरोवर चे समोरील मानस तलाव मध्ये MH 14 CY 0010 क्रमांकाची चार चाकी गाडीसह तलावात गाडी गेली असल्याचे सकाळी 8.15 वाजता 112 वर काॅल वर कळविल्यानंतर सदर ठिकाणी जावुन गाडी क्रेन च्या साह्याने बाहेर काढली. त्यामध्ये एक इसम मृत अवस्थेत मिळून आला असून सदर इसमें चे नाव आधार कार्ड वर रामदास हरिचंद्र पवार वय 40 वर्ष रा. आंबेगाव बु , पुणे असे आहे. मयताचे ओळख पटवून पुढील तपास पौड पोलिस करत आहेत.
वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की ,आज दिनांक 08/01/2024 रोजी सकाळी 09.00 वा चे सुमारास मी माझे कंपनीत असताना मला माझा मित्र प्रविण नायकले याचा फोन आला की, मानस तलावा जवळ एक कार पाण्यात बुडली असुन ती बाहेर काढले नंतर त्यात रामदास पवार याचे आधार कार्ड मिळाले आहे. तो आपलेच कंपनीत कामास आहे असे सांगितले नंतर मी व माझे कंपनीतील मित्रा सोबत मानस तलावा पाशी गेलो व तेथे जावुन पाहिले असता सदरची स्कोडा कार मधुन बाहेर काढलेला इसम हा रामदास हरिचंद्र पवार वय 40 वर्षे असे होते. त्यास अँम्बुलन्सने पौड ग्रामीण रूग्णालय येथे आणले असता तेथील डाँक्टारांनी तो मयत असल्याचे सांगितले. खबरी वरून मयत रजिस्टरी दाखल करून मा वरिष्ठांचे आदेशांने पुढील तपास म. पो. हवा. रवळेकर/291 हे करीत आहेत.
More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी पेरीविंकल स्कूलचा प्रयत्न, विज्ञानदिना निमित्त विज्ञान प्रदर्शनाचे पिरंगुट शाखेत आयोजन..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!