November 22, 2024

Samrajya Ladha

प्लास्टिक व ई कचरा बाबत बावधन मध्ये जनजागृती आणि संकलन मोहिमेस सुरुवात..

बावधन :

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १० आणि नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक मध्ये,bपुणे महानगरपालिका,कमिन्स इंडिया फाऊंडेशन, जनवाणी संस्था, रायन इंटरनॅशनल अकॅडेमि बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने रायन इंटरनॅशनल अकॅडेमि, या शाळे मध्ये प्लास्टिक व ई कचरा बाबत जनजागृती आणि संकलन मोहिमेस विद्यार्थी कढून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रम मा. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदिप कदम साहेब, मा. उपायुक्त परिमंडळ क्र .०२ श्री.संतोष वारूळे साहेब, महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरीष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक श्री.हनुमंत चाकणकर मुकादम श्री राम गायकवाड प्राचार्या – सौ रुची मसिह प्रशासक – श्री अतुल डांगे ,जनवाणीचे श्री उमेश भाग्यवंत, श्री.हेमंत गावंडे यांच्या उपस्थित प्लास्टिक व ई कचरा जनजागृती आणि संकलन मोहिमेस सुरूवात करण्यात आली.