May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पंडित डॉ. मोहनकुमार दरेकर षष्ट्ब्दीपूर्ती संगित समारोह चे आयोजन…

कोथरुड :

पंडित डॉ.मोहनकुमार दरेकर यांच्या षष्ट्ब्दीपूर्ती संगित समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित डॉ.मोहनकुमार दरेकर षष्ट्ब्दीपूर्ती समितीच्या वतीने आयोजित संगीत समारोहात पंडित शौनक अभिषेकी व अभेद अभिषेकी यांचे गायन होणार आहे.

 

या समारोहाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून पंडित डॉ.विकास कशाळकर, पं. अजित कडकडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रा.मेधा कुलकर्णी, अनंतश्री विभूषित श्री. श्री. चंद्रतनय दादा हे उपस्थित राहणार आहेत.

कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवार (ता.१०) रोजी सकाळी साडे आठ वाजता हा संगीत समारोह होणार आहे. यामध्ये तबला संगत भरत कामत, गीत इनामदार तर हार्मोनियम संगत सुयोग कुंडलकर व मालू गावकर हे करणार असल्याची माहिती पंडित डॉ.मोहनकुमार दरेकर षष्ट्ब्दीपूर्ती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.