March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांचे यशवंतराव नाट्यगृहात चित्र प्रदर्शन.

कोथरुड :

“जिविधा” या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘व्याघ्रसंवर्धन’ या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्था निसर्ग आणि व्याघ्रसंवर्धन या विषयावर गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहे. निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अग्रगण्य असणारी जिविधा ही संस्था जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवलते. भारत सरकारच्या व्याघ्रसंवर्धन उपक्रमाच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त “जिविधा” या संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधे चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील विद्यार्थ्यांनी आपला उत्साही सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या सर्व चित्रांची निवड झाली. निवड झालेल्या चित्रांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत भरवण्यात आले होते. या निवडीमुळे चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या बावधन शाखेच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलला बहुमान प्राप्त झाला.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी वाघांची अतिशय हुबेहूब चित्रे रेखाटली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. स्पर्धेच्या आयोजकांनी पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर आणि संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत त्यांच्यात दडलेले सुप्त गुण ओळखून त्यांची प्रशंसा केली.

या स्पर्धेसाठी मुलांना मुख्याध्यापक स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक प्राजक्ता पिल्ले व जाधव सर यांनी मदत केली.