सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेमध्ये अँनुअल स्पोर्ट्स मीट – 2023-24 चा प्रारंभ शुक्रवार दि. 8डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात करण्यात आला. दिमाखदार पद्धतीने अनार व फेटे घालून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वतीपुजन व दीप प्रज्वलनाने करून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके व प्रसिद्ध मिस्टर इंडिया,वर्ड चॅम्पियनशिप मध्ये भरता कडून सुवर्णंपद विजेते बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण, पौड पोलीस स्टेशन चे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मा श्री रमेश गायकवाड साहेब तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौं रेखा बांदल, सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडीत व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांचे व मान्यवारांचा संस्थेचे संस्थापक श्री बांदल सर यांच्याकडून शाल नारळ पुष्पगुछ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.दीपप्रज्वलन करून आपले खेळाडू मशाल घेऊन आले व मशाल प्रज्वलित करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. आशिया चॅम्पियन महेंद्र चव्हाण, API गायकवाड साहेब, मा.बांदल सर व सर्व मान्यवर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
सर्वांनी सुद्रुढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगून अभ्यासा बरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची असते असे सांगून खेळाने माणूस घडतो व बरेच पैलू खेळाने विकसीत होतात त्यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे व खेळासाठी जे काही लागेल ते करण्याची तयारी ठेवली तर अनुकूल परिस्थितीतही सुवर्णं पदक पटकवता येते याचे जिवंत उदाहरण आज महेंद्र चव्हाण यांच्या रूपात सर्वांसमोर आहे.
तर आनंदी जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे व प्रत्येक विद्यार्थ्यानी, पालकांनी व शिक्षकांनी किमान अर्धा तास तरी रोज व्यायामासाठी काढावा व वाचन करावे असा मोलाचा संदेश API गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना देऊन पेरिविंकल च्या सूस शाखेने स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून शाळेत आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आजकाल अभ्यासाबरोबरच क्रीडा व खेळ यांना पण खूप महत्व अभ्यासाबरोबरच खेळ व त्यात प्रावीण्य प्राप्त करणे खूप अभिमानाची बाब आहे. पेरीविंकलच्या सूस शाखेमधून एक तरी ऑलम्पिक वीर किंवा बॉडी बिल्डर व्हावा असे सांगून गोल्ड मेडलीस्ट महेंद्र सर यांनी स्वतःची जीवनगाथा अत्यंत सुबकपणे सर्वांपुढे उलगडून अनुकूल परिस्थितीतून इथपर्यंतचा प्रवास खूप रोचकपणे त्यांच्या भाषणात व्यक्त केला. फक्त जिद्द ठेवली व ठरवले तर जगज्जेता होणे अवघड नाही असे प्रतिपादन विश्वविजेता महेंद्र चव्हाण यानी त्यांच्या भाषणात केले.
स्पोर्ट्स डे चे औचित्य साधून एक आगळा वेगळा उत्साही वातावरणात मान्यवरांच्या हस्ते शाळेचा झेंडा मानाने फडकाऊन व राष्ट्रगीताने ओपनिंग सेरेमनी करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी खेळ प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर भूमीपूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खो-खो च्या ओपनिंग मँच साठी फीत कापून क्लेपर वाजऊन मँच चा प्रारंभ करण्यात आला. सर्व खेळाडूंना मान्यवरांनी उत्तेजीत करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर इनडोअर गेम्स चे ओपनिंग मान्यवारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी , सचिन खोडके, सन्मती चौगुले, क्रीडा शिक्षिका शैला परुळेकर व ज्ञानेश्वर मोरे यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने खेळाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ प्रफुल्ला पाटील व अमिता जॉनी यांनी केले.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!