September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

नांदे ते महाळुंगे रस्त्याची दुरवस्था झाल्याने नांदे गाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन…

नांदे :

नांदे ते महाळुंगे रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रशासनाच्या विरोधात नांदे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून नांदे ते महाळुंगे हा रस्ता ठेकेदार आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची स्थिती बिकट झाली असुन खूप मोठे खड्डे झाल्याने ग्रामस्थांना रस्त्याचा वापर करणे मुश्किल झाले असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वैतागलेले ग्रामस्थांना अखेर आक्रमक होत रस्त्यावर उतरावे लागले.

सुमारे दिड तास केलेल्या आंदोलनामुळे फार मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी १० जानेवारी पर्यंत रस्त्याचे काम न केल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी यावेळी दिला. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.

 

You may have missed