April 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नाट्यपर्वणी, अभिनेते मनोज जोशी यांच्या ‘चाणाक्य’ नाटकाचे दोन मोफत प्रयोग

कोथरुड :

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पुणेकरांना नाट्यपर्वणी अनुभवता येणार असून, प्रसिद्ध सिने अभिनेते मनोज जोशी यांच्या चाणाक्य नाटकाचे दोन प्रयोग मोफत प्रयोग दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी दि ६ डिसेंबर रोजी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात प्रवेशिका मिळणार आहेत.

 

भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणाक्य हे एक महान विद्वान आणि कुशल रणनीतिकार होते. त्यांची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या धोरणांद्वारे, एखादी व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात धर्म-अधर्म, कर्म, पाप-पुण्य याशिवाय यशाचे अनेक मंत्र सांगितले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या जीवनावर अभिनेता मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ या नाटकाची निमिर्ती केली असून, या नाटकाचा मोफत प्रयोग नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ आणि रात्री ९ वेळेत हे दोन नाट्यप्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

या नाटकाच्या प्रवेशिका दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड, बाणेर जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कसबा भागातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यान्वित नागरी सुविधा केंद्रातही सदर नाटकाच्या प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत‌. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed