September 8, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, बोपोडी परिसरात जाणार ‘विकसित भारत संकल्प रथ’,केंद्र शासनाच्या विविध योजनांची मिळणार माहिती..

बाणेर :

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी.एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना व पुणे मनपाची शहरी गरीब योजना, मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे.

 

आतपर्यंत एकूण २४ ठिकाणी विकसित भारत संकल्प रथाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये पुणे शहरात्तील ५६७५५ नागरिकांपर्यंत माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष ८९८६ नागरिकांना विकसित भारत यात्रेत लाभ देण्यात आला. सकाळ व दुपार सत्रामध्ये आतापर्यंत कसबा गणपती मंदिर परिसर, दगडूशेठ हलवाई मंदिर परिसर, शनिवार वाडा परिसर, सेवा मित्र मंडळ परिसर, महाराणा प्रताप बाग, सणस मैदान परिसर, खडकमाळ आळी चौक, मिठगंगा पोलीस चौकी, महात्मा फुले स्मारक, रामोशी गेट परिसर, कामगार मैदान परिसर भवानी पेठ, पवळे चौक, निंबाळकर तालीम चौक, पत्र्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, कमला नेहरू पार्क, चित्तरंजन वाटिका बाग, छत्रपती शिवाजीनगर गावठाण परिसर, पीएमसी बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज बागेचा परिसर, गुडलक चौक परिसर, एफ सी कॉलेजचे मुख्य गेट, ओम सुपर मार्केट परिसर, खैरेवाडी परिसर या ठिकाणी प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी(स्वनिधी),आरोग्य तपासणी शिबीर/राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम,प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजना ,उज्वला गॅस योजना,आधार अपडेट ,शहरी गरीब योजना पुणे मनपा, गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना इत्यादी योजनां राबविण्यात येत आहेत.

यावेळी मा. महापालिका आयुक्त श्री.विक्रमकुमार मा.अतिरिक्त महापालिका डॉ.कुणाल खेमनार मा. उप आयुक्त तथा नोडल अधिकारी श्री नितीन उदास, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त,घोले रोड सहाय्यक आयुक्त, भवानी पेठ सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.

विकसित भारत संकल्प रथ पुढील आठ दिवसात खालील ठिकाणी जाणार आहे.
क्र तारीख दिवस स्थाने वेळ
१ 10-Dec-23 रविवार बारामती हॉस्टेल क्षेत्र 10:00 ते 01:00
10-Dec-23 रविवार परिहार चौक, औंध 02:00 ते 06:00
२ 11-Dec-23 सोमवार पांडव नगर परिसर 10:00 ते 01:00
11-Dec-23 सोमवार पुणे विद्यापीठ परिसर 02:00 ते 06:00
३ 12-Dec-23 मंगळवार छाजेड पेट्रोल पंप परिसर, बोपोडी 10:00 ते 01:00
12-Dec-23 मंगळवार रोहन निलय, औंध 02:00 ते 06:00
४ 13-Dec-23 बुधवार बालेवाडी हाय स्ट्रीट 10:00 ते 01:00
13-Dec-23 बुधवार बालेवाडी फाटा चौक 02:00 ते 06:00
५ 14-Dec-23 गुरुवार गणराज चौक 10:00 ते 01:00
14-Dec-23 गुरुवार बाणेर गावठाण परिसर 02:00 ते 06:00
६ 15-Dec-23 शुक्रवार पाषाण गावठाण परिसर 10:00 ते 01:00
15-Dec-23 शुक्रवार नळ स्टॉप परिसर, कोथरूड 02:00 ते 06:00
७ 16-Dec-23 शनिवार कर्वे पुतळा परिसर 10:00 ते 01:00
16-Dec-23 शनिवार कमिन्स कॉलेजचे मुख्य गेट 02:00 ते 06:00
८ 17-Dec-23 रविवार किनारा हॉटेल चौक 10:00 ते 01:00
17-Dec-23 रविवार सारबाग बागेचा परिसर 02:00 ते 06:00

तरी पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.