September 8, 2024

Samrajya Ladha

हिंदू युवा प्रबोधिनी आयोजित धर्मरक्षक स्नेह संमेलन संपन्न..

पुणे :

हिंदु युवा प्रबोधिनीच्या पदनियुक्तींचा कार्यक्रम व मेळवा सावरकर अध्ययासन केंद्र, पुणे येथे पार पडला. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संत तुकारामांचे ११ वे वंशज ह.भ.प.शिरिष महाराज मोरे, भारतिय वारकरी मंडळ अध्यक्ष ह.भ.प. संदिप महाराज पळसे, इतिहास तज्ञ, वक्ते मा.सचिन पाटील सर हे उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना तुकोबारायांनी लोकांना धर्मपालनाचे व एकजुटीचे महत्व पटवून दिले व भक्ती शक्तीचा मेळ साधला. शिवरायांनी याच संस्काराच्या पायावर स्वराज्य निर्मिती केली. आपणही सामाजिक स्तरावर कार्य करताना धर्माचे पालन करणे आवश्यक आहे. असे सांगत संत तुकाराम महाराजांच्या ‘धर्माचे पालन ! करणे पाखंड खंडन !’ या अभंगाचे उदाहरण मोरे महाराज यांनी दिले.

‘आम्ही सर्व वारकरी देशाचं काम करणाऱ्या तरुण युवकांच्या पाठीशी आहोत’ असे प्रतिपादन पळसे महाराज यांनी केले.

याप्रसंगी सचिन पाटिल यांनी या देशाचा इतिहास व संस्कृती उलगडून सांगत भारतीय संस्कृती ची महती सांगितली.

हिंदू युवा प्रबोधिनी ने शहर स्तरावर कार्यजबाबदारी सोपवताना ५० पेक्षा जास्त पदाधिकारी नेमले असुन , सामाजिक स्तरावरील कार्यासाठी त्यांनी संकल्प केला आहे. प्रबोधिनी चे संस्थापक मा.राजेंद्र बेंद्रे यांनी प्रबोधिनीच्या कार्याचा आलेख व कामकाजाचे स्वरूप स्पष्ट केले.

संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा, राजकिय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर या मेळाव्यास उपस्थित होते.