April 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणेकर ३०६६ पालकांनी आपल्या पाल्याला गोष्ट सांगत मोडला चीनचा विश्वविक्रम…

पुणे :

दिनांक १४/१२/२०२३ रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत एस पी कॉलेज येथे स्टोरी टेलिंग वर्ल्ड रेकॉर्ड करिता मे. महाराष्ट्र शासन ,पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नॅशनल बुक ट्रस्ट, एसपी कॉलेज यांच्या संयुक्तपणे स्टोरी टेलिंग वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलेले आहे.

 

यामध्ये सुमारे ३०६६ पालकांनी आपल्या पाल्याला गोष्ट सांगितली. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधने व संस्कार करणे करिता आपल्या पाल्याला गोष्टी सांगण्याचे महत्त्व या उपक्रमाद्वारे पटविण्यात आले. तसेच यापूर्वीचा चीन देशाचा विश्वविक्रम मोडीत काढला.

सदर कार्यक्रमास माननीय महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉक्टर सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष एस के जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संस्थापक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.