बाणेर :
बाणेर-सुस रस्त्यावरील सायकल ट्रॅक आणि पदपथाचे रखडलेले काम अखेर सुरू झाले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी परिसरातील नागरिकांशी केलेल्या चर्चेनंतर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका (PMC) अधिकारी व संबंधित कंत्राटदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
अपूर्ण ड्रेनेजमुळे रखडले होते काम
बाणेर-सुस मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजचे काम अपूर्ण राहिल्याने सायकल ट्रॅक आणि पदपथाचे काम रखडले होते, ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी या भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी तसेच संबंधित कामाच्या कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर सायकल ट्रॅक व पदपथाचे अपूर्ण राहिलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. काल या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला, ज्यामुळे नागरिकांना लवकरच पूर्ण झालेल्या सायकल ट्रॅक आणि पदपथाचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी