April 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

तब्बल एक लाख दिव्यांनी सजले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन..

पुणे :

मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

You may have missed