April 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्ती आखाडा संपन्न; सिकंदर शेख ठरला विजेता!

बालेवाडी : 

बालेवाडी येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ बालेवाडी तसेच धर्मवीर आखाडा बालेवाडी यांच्या वतीने जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व.पै.मगनदादा बालवडकर यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर व उद्योजक सनी मगनशेठ बालवडकर यांच्या वतीने पै.सिकंदर शेख(महाराष्ट्र केसरी) वि. पै.विशाल भोंडु(पंजाब केसरी) यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. यामध्ये पै.सिकंदर शेख यानी पै.विशाल भोंडु याला चितपट करत मानाची गदा व रोख रक्कम ५,००,००० चे बक्षिस पटकावले. या जंगी कुस्ती आखाड्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी स्टेज मंडपासाठी २,५०,००० रुपयांची देणगी दिली.

 

 या आखाड्यात अनेक नामांकित पैलवानांनी आपली ताकद आजमावली. महिला कुस्ती च्या सामन्यात विजयी पारितोषिक ७५,००० रुपये हे सोनाली मंडलिक यांनी पटकावले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संजय फार्म, दसरा चौक बालेवाडी येथे करण्यात आले होते.

You may have missed