कोथरूड :
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील अनुभव पाठीशी असणाऱ्या भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांच्याकडे पुढील होणाऱ्या नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी शहर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. लहु बालवडकर हे कँबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्याकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मोठी जबाबदारी दिल्याने स्थानिक राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात लहु बालवडकर यांच्याकडे शहर भाजपने चिटणीस पदाची जबाबदारी दिली होती, त्यात त्यांनी बालेवाडी, औंध, बाणेर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण या भागात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना 22634 मतांची आघाडी मिळवून दिली, अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मधून चंद्रकांतदादा पाटील यांना सुध्दा 30349 मतांची आघाडी मिळवून यांच्या विजय सोपा केला, या दोन्ही विजयात बालवडकर यांचा मोठा वाटा राहिलेला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लहु बालवडकर यांनी मतदारसंघात मेहनत घेत विजयात मोठी भुमिका निभावली होती. याचेच फळ म्हणून आता शहर भाजपने त्यांच्याकडे भाजपा कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष पद सोपविले आहे.
राज्यात अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच भाजपने प्रत्येक मतदारसंघात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून लहु बालवडकर यांच्याकडे कोथरूड उत्तर मंडल चे अध्यक्ष देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून लहू बालवडकर भाजपचे एकनिष्ठाने काम करीत आहेत. प्रभाग क्र.९ या भागात त्यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी जनसंपर्क वाढविला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यानही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला होता. यातच चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत जवळीक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.
More Stories
‘सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू..प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती
बाणेर येथील योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांच्या मातोश्रींचे निधन
बालेवाडीत हरवलेली तीन मुले शिवम बालवडकर यांच्या प्रयत्नाने एका तासात सापडली!