May 6, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी सबस्टेशनचे काम लवकरच सुरु व्हावे म्हणून गणेश कळमकर यांची महावितरण आणि महापारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची सकारात्मक भेट..

पुणे :

बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बालेवाडी सबस्टेशनचे रखडलेले काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. पुणे महावितरण विभागाचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार आणि महापारेषण विभागाचे मुख्य अभियंता श्री अनिल कोलप यांच्यासह सहायक अभियंता संदीप हाके व प्रकाश कुरुसुंगे यांच्यासोबत भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांची नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बालेवाडी सबस्टेशनच्या कामाला गती देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

 

माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी २३ मार्च २०२५ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून बालेवाडी येथील स.न. ४/१ मधील ६५ गुंठे जागेत अति उच्च दाब उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापारेषण कंपनीला तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर, पुणे महावितरण विभाग आणि पुणे महापारेषण विभागाने या कामाचा अहवाल तयार करून प्रकाशगंगा कार्यालय, मुंबई येथे मान्यतेसाठी पाठवला आहे. लवकरच या अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

या भेटीनंतर बोलताना भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी सांगितले की, बालेवाडी सबस्टेशनचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी दोन्ही विभाग सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत. या सबस्टेशनमुळे बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे आणि पाषाण या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.