May 7, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगाव श्री काळभैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न; कुस्ती स्पर्धेत पैलवान शंकर बंडगर यांनी मानाची गदा जिंकली..

सुसगाव :

सुसगाव येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पैलवान शंकर बडगर यांनी उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत मानाची श्री काळभैरवनाथ गदा आपल्या नावे केली. त्यांनी अंतिम लढतीत पैलवान सागर देवकाते यांचा पराभव केला.

 

दरवर्षी वप्रमाणे या वर्षीची श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत अत्यंत रोमांचक झाली. पैलवान शंकर बडगर आणि पैलवान सागर देवकाते यांच्यातील लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांनीही आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन केले, परंतु अंतिम बाजी शंकर बंडगर यांनी मारली आणि मानाची गदा जिंकली.

यावेळी, कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी पैलवान जयसिंग अर्जुन चांदेरे यांना ग्रामस्थांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाला गौरवण्यासाठी हा सन्मान देण्यात आला.

यात्रेचे यशस्वी आयोजन हनुमान तालीम संघ व श्री काळभैरवनाथ उत्सव कमिटी-सुसगाव यांच्यासह ग्रामस्थांनी केले होते. यात्रेमुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.