पुणे :
पुणे शहर औंध विभागात गुणवत्ता संवर्धन अभियानात विद्यापीठ हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांचा सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे शहर व आय.आय.बी. करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला- क्रीडा रंगमंच येथे एका भव्य पालक विद्यार्थी मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात गुणवत्ता संवर्धन अभियानातील विजेत्या शाळांचा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही कोण होणार आहात याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित करा. जितके जास्त कष्ट घ्याल, तितके मोठे यश तुम्हाला मिळेल. त्यामुळे पूर्ण मनोभावे प्रयत्न करा.”
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आय.आय. बी. इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथ पाटील, बालाजी वाकोडे पाटील, बनवारीलाल जांगिड (नांदेड), ॲड. महेश लोहारे, ॲड. कल्पना लोहारे, दैविक मंठाळे, मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, प्रवक्ते प्रसाद गायकवाड, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव किशोर बोरसे, कार्याध्यक्ष शिवाजी कामठे यांच्यासह ३००० हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
या गुणवत्ता संवर्धन अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरातील ५१ शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. औंध विभागात विद्यापीठ हायस्कूलने मिळवलेल्या प्रथम क्रमांकामुळे संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
बाणेर येथील योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांच्या मातोश्रींचे निधन
बालेवाडीत हरवलेली तीन मुले शिवम बालवडकर यांच्या प्रयत्नाने एका तासात सापडली!
बालेवाडीच्या सी एम इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेजचा बारावीत शतप्रतिशत निकाल!