April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूसगावातील मुंजोबा चौक ते शिवबा चौक रस्त्याचे डांबरीकरण बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण; श्री भैरवनाथ यात्रेपूर्वी नागरिकांना मोठा दिलासा..

सूस :

सूस गाव येथील मुंजोबा चौक ते शिवबा चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या भागातील रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला होता, त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत होत्या. विशेषतः १९ व २० एप्रिल रोजी सूसगावात श्री भैरवनाथ यात्रा असल्याने भाविकांची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक होते.

 

या गंभीर समस्येची दखल घेत माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी तातडीने पाऊले उचलली. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने पाठपुरावा करून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. यामुळे आता परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री भैरवनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता आता अधिक सोयीस्कर झाला आहे.

या कार्याबद्दल बोलताना माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, “सूसगावातील नागरिकांची गैरसोय माझ्या लक्षात आली होती. श्री भैरवनाथ यात्रेपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पुणे महानगरपालिकेनेही या कामात चांगले सहकार्य केले. आता रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांना आणि भाविकांना होणारा त्रास कमी झाला आहे, याचा मला आनंद आहे.”

सूसगावातील नागरिकांनी आणि यात्रा समितीने बाबुराव चांदेरे यांच्या या प्रयत्नांचे आभार मानले आहेत. यावेळी गणेश हनुमंत सुतार चेअरमन, नितीन किसन चांदेरे माजी ग्रामपंचायत सदस्य, दिलीप सुरेश बांदल माजी तंटामुक्ती अध्यक्ष,, सुखदेव चांदेरे, चंद्रकांत काळभोर, मनोज चांदेरे , अजिंक्य चांदेरे, ह भ प शिवराम भाऊ चांदेरे उपस्थीत होते.

You may have missed