April 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे, सह शहरात आयोजन..

बाणेर :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन (NMO) च्या वतीने बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे, सह शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांसाठी तसेच बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

हे शिबिर शनिवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत शहरातील ७५ वस्त्यांमध्ये होणार आहे. पुणे आणि परिसरामध्ये एकाच वेळी ७५ ठिकाणी होणारे आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे व सुमारे ७ ते १० हजार नागरिकांचा याचा फायदा होणार आहे. यासाठी पुणे शहरातील विविध संस्थांमधील नामवंत डॉक्टर या शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांच्या तपासण्या, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग जागृती व आरोग्यविषयक माहिती आणि शिक्षण, इतर आरोग्य तपासण्या आणि मोफत औषध वितरण यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.

यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, एस एन वैद्यकीय महाविद्यालय, सिम्बायोसिस वैद्यकीय महाविद्यालय, लोक विकास फाउंडेशन, अनुलोम, गुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, बाळासाहेब देवरस रुग्णालय, इंदिरा आय व्ही एफ, मेट केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डी एच एस क्रिझल जिलेटल फिजिकल थेरपी कॉलेज, तेजओम आय केअर फाउंडेशन आदी सहभागी होणार आहेत.

शिबिराच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इच्छुक नागरिक राजाभाऊ यांच्याशी ९८५०६०१६३५ या क्रमांकावर, अरुण यांच्याशी ९०११९२२१७१ या क्रमांकावर किंवा अभिषेक यांच्याशी ७५५८५६४८३९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हे आरोग्य शिबिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You may have missed