April 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव निमित्त पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; रंगणार निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाडा..

बालेवाडी :

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांचा वार्षिक उत्सव बालेवाडी येथे पारंपरिक धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात सुरू झाला. विविध धार्मिक विधींच्या आयोजनाने उत्सवाला प्रारंभ झाला आणि श्री काळभैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने या भक्तिमय वातावरणाची उंची वाढवली. उत्सव निमित्त गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे.

 

परंपरेनुसार, ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत श्री काळभैरवनाथ देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने पुढे पुरुष व महिला भजनी मंडळाची भजनाची साथ घेत मार्गस्थ झाली. ‘नाथ साहेबांचा चांगभले’ च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. पालखीने गावातील प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा पूर्ण केली, ज्यात अबालवृद्धांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याकडे विशेष लक्ष असुन या आखाड्यात नामवंत पहिलवान आपली ताकद आणि कौशल्ये दाखवणार आहेत. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी विशाल भोंडू हि लढत होणारअसून अनेक नामवंत पैलवान मैदानात उतरून आपले कसब दाखवतील. त्यामुळे कुस्ती शौकिनांनी या रोमांचक लढतींचा आनंद घेता येणार आहे. आखाडा आयोजनासाठी समस्त ग्रामस्थ बालेवाडी आणि धर्मवीर आखाडा यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.