सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलच्या सूस, बावधन ,पिरंगुट पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीची सुरुवातच पेरिविंकलच्या सूस शाखेपासून करण्यात आली.
शिक्षणाबरोबरच संस्कृती ची मुलांवर छाप असलेल्या पेरिविंकल मध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरवात पारंपरिक पुणेरी पद्धतीने म्हणजे “दिवाळी पहाट ” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आली .पेरीविंकल मधील सूस शाखेत दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायिका अनघा नवरे, गायक आनंद नवरे व अभय मराठे प्रस्तुत “स्वरगंध” या हिंदी व मराठी सुगम गीतांची बहारदार मैफिलिचे प्रयोजन दिवाळीच्या वसुबारस चे औचित्य साधून सकाळी 7 वाजता कण्यात आले होते.
“दिवाळी पहाट” या अनोख्या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या प्रसंगी गायक मान्यवर , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्रीं राजेंद्र बांदल ,संचालिका सौ रेखा बांदल ,यश बांदल ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित ,पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक श्रीं अभिजीत टकले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व गायक मान्यवरांचा सत्कार शाळेचे संस्थापक व संचालिका यांच्याकडून करण्यात आला .
त्यानंतर इश्स्तवनाने मंजुळ स्वर त्यांचे गंध पसरवत, विठू माऊली, हा रुसवा सोड सखे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सत्यम शिवम सुंदरम, ने मजसी ने अशा एक से बढ़कर एक गीतांची सुरेल मैफिल रंगत गेली. सर्वांनी या आगळ्या वेगळ्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. *या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमासाठी शाळेचा पालकवर्ग , विद्यार्थी , शिक्षकवृंद व समस्त सूस मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .सर्वांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला . समस्त रसिक प्रेक्षक वर्गानी गायकांना व दिवाळी पहाट च्या या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली.
या कार्यक्रमानंतर वात्सल्यतेचं प्रतिक असेलेले खरोखरचे गाय आणि वासरू सर्व शाखांनी शाळेच्या आवारात आणून विद्यार्थ्याना वसुबारसचे महत्व समजावून समस्त शिक्षकांनी गोमातेचे पूजन केले.
त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना बोनस व मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये संस्थेचे संस्थापक स्वतः हजर होते .
दिवाळी निमित्त मिठाई आणि बोनस वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात गो -पुजनाने करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना मिठाई व बोनस देण्यात आले. तर सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त दिवाळी फराळा च्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी वसुबारस व दिवाळीचे सर्व दिवसांचे महत्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *श्री राजेंद्र बांदल यांनी आजची दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करून अत्यंत पॉज़िटिव एनर्जी निर्माण झाली व एक नवीन पायंडा सूस ब्रांच ने रोवून खरोखरच एक न्यारी दिवाळी ची सुरवात करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले असे सांगून खरोखरच शाही दिवाळीच साजरी झाली व यासाठी अगदी खालच्या वर्गापासून ते अगदी प्रिन्सिपल पर्यंत सर्वांमध्ये एकता व समन्वयता असली तर आणि तरच असे शाही कार्यक्रम होऊ शकतात असे सांगून सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक श्रीं राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने सर्व पर्यवेक्षक तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत उत्साहात संपन्न झाला. “दिवाळी पहाट”चा असा आगळा वेगळा कार्यक्रम ठेऊन शाही दिवाळी साजरी करणारी मुळशी मधील एकमेव शाळा असेल असे सर्वांनी सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील व सचिन खोडके यांनी केले होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!