December 3, 2024

Samrajya Ladha

सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांनी सोसायट्यांच्या अडचणी सोडविण्याचे दिले आश्वासन…

सुस :

शनिवार दिनांक ७/१०/२३ रोजी भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री संग्राम (दादा) थोपटे यांनी सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन तर्फे आयोजित आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमात उपस्थिती लावली.

त्यांच्या समवेत मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुसगावचे मा. उपसरपंच सुहास भोते, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, प्रसाद खाणेकर, दिनेश ससार, महेश पाडाळे अदि मान्यवर उपस्थित होते. तसेच सोसायटी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असोसिएशन मधील सर्व सोसायटी वर्गाने आमदार साहेबांकडून त्यांच्या आमदार निधीतून किंवा त्यांच्या सहकार्याने सोसायटीच्या अंतर्गत विविध गोष्टींची मागणी केली. प्रामुख्याने सर्व सोसायटी धरकांने सोलर पॉवर प्लांट ची मागणी केली. तश्या प्रकारचे निवेदन सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुदीप पाडाळे यांनी आमदार साहेबांसमोर वाचून दाखवले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार श्री संग्राम(दादा) थोपटे यांनी आपल्या मनोगतामध्ये वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी १००% मदत करण्याचे आश्वासन यांनी दिले. आमदार निधीतून सर्व सोसायटी धारकांसाठी जे काही करू शकतो ते सर्वोत्परी करण्याचा प्रयत्न मी करेन, असा शब्द सर्व सोसायटीतील नागरिकांना दिला. तसेच आमदार साहेबांनी पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए आयुक्त यांची भेट घेऊन सोसायटी मधील अमेनिटी स्पेस मध्ये विभागातील रहिवाशांसाठी उद्याने करता येतील यासाठी ही प्रयत्न करू असे सांगितले.

सदर कार्यक्रमा मध्ये सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनचे संस्थापक कै. प्रदीप (दादा) पाडाळे यांच्या स्मरणार्थ पाडाळे परिवारातर्फे आमदार संग्राम (दादा) थोपटे. यांस श्री शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे अध्यक्ष सुदीप पाडाळे यांनी केले आणि प्रस्तावीक श्री. रमेश धनगर यांनी केले आभार असोसिएशनचे सदस्य श्री. राजेंद्र नेवे यांनी केले.