November 21, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे गावचे काळूराम गायकवाड यांची जिल्हा संघटक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा पदी निवड.

म्हाळुंगे :

म्हाळुंगे गावचे माजी सरपंच काळूराम गुलाब गायकवाड यांची  दुर्ग सेवक म्हणून केलेल्या कामाचा सन्मान म्हणून पुढील एक वर्षासाठी जिल्हा संघटक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे परीसरात दुर्ग सेवा करण्यास अजुन प्रोत्साहन मिळणार आहे. गायकवाड यांनी नादगडांचा या ग्रुपचे संस्थापक म्हणून युवकांना एकत्र करीत गड किल्ल्यांचे संवर्धन आणि अनेक उपक्रम राबविले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे दुर्ग सेवक म्हणून केलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली याचा मला आनंद वाटत आहे. या कालावधीत संस्थेने सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठा पूर्व संस्थेचे संविधान संस्थेची तसेच आपले विभागातील समस्त सदस्य आजी-माजी पदाधिकारी सहकाऱ्यांचा सर्वांचा मानसन्मान ठेवून तसेच सर्वांना एकत्र घेऊन सौजन्याने उत्कृष्टपणे पार पाडणार आहे.

संस्थेचे नियोजित दुर्गसंवर्धन सामाजिक उपक्रम कार्य आपले विभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संस्थेने माझ्यावर सोपविली आहे. ती मी मोठ्या उत्साहात निष्ठेने सर्वांना सोबत घेऊन करणार आहे असे काळूराम गायकवाड यांनी सांगितले.