सुसगाव :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिसरातील महिला भगिनिंसाठी माजी नगरसेवक स्थायी समितीचे मा.अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन सुस गावच्या मा. ग्रामपंचायत सदस्या सौ. वृषाली नामदेव चांदेरे यांच्या निवासस्थानी श्री राहुल बालवडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महिलांच्या कल्पनेला संधी मिळावी व आपली संस्कृती देखील जोपासली जावी या हेतुने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक/ मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सतरा वर्षे २००६ पासुन अखंडपणे गौरी सजावट स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू असून पहिल्याच वर्षी १७५ महिलांनी सहभाग घेतला होता ज्यासाठी एकूण ४ कॅमेरे वापरले. आता हाच आकडा १२५० पेक्षा जास्त झालाय ज्यासाठी २५ कॅमेरे वापरत आहोत.
गौराइंचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक गृहिणी आपली कला व कल्पकता वापरून आकर्षक आरास करत असते, महिलांची ही कला सर्वांसमोर आणण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे. यंदाच्या गौरी सजावट स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक स्थायी समितीचे मा.अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष श्री नितीन कळमकर, चाकणच्या प्रथम नगराध्यक्षा सौ.पूजा चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय कळमकर, सौ.ज्योती राहुल बालवडकर, सौ.पूनम विशाल विधाते, सौ.सारिका काळभोर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सौ.सुषमा ताम्हाणे, श्री चंद्रकांत काळभोर, श्री नामदेव चांदेरे, सौ.राजश्री राक्षे, सौ.वैशाली चांदेरे व सौ.गोकर्णा बालवडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!