August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस येथील पेरिविंकलचे स्कूलचे विद्यार्थी नृत्यकलेतही अव्वल, आंतरशालेय नृत्यस्पर्धेत पटकावले बक्षिस..

पुणे :  

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांनी पुण्यात झालेल्या आंतरशालेय नृत्यस्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावून परत एकदा पुण्यातील शाळांमध्ये पेरीविंकल च्या सूस शाखेने एक मानाचा तुरा रोवला आह़े.

 

 शुक्रवार दि.15 सेप्टेंबर रोजी परांजपे सविद्यालय आयोजित लॉ कॉलेज रोड – पुणे येथे आंतरशालेय नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 2 गटांचा सहभाग होता .इयत्ता 6वी -7वी  तील विद्यार्थ्यांचा ‘अ ‘ गट व इयत्ता 3री व 4थीतील विद्यार्थ्यांचा ‘ब ‘ गट असे 2 गट पाडण्यात आले होते .

लोकनृत्य ही थीम घेऊन नृत्य सादरीकरण करण्याकरिता पुण्यातील प्रत्येक गटातील 32 शाळांनी यात भाग घेतला होता . त्यातील पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल च्या सूस शाखेने “अ’ गटातून तृतीय क्रमांक पटकावून केवळ मुळशीतच नव्हे तर पुण्यातही आपला ठसा उमटवून शाळेची  व शिक्षकांची मान उंचावून गौरवास्पद बक्षीस पटकावले आह़े. यात एकूण 22 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मानचिन्ह व रोख बखिस असे बक्षिसांचे स्वरूप होते. केवळ अभ्यासात नव्हे तर अभ्यासाव्यतिरिक्त व शाळाबाह्य जाऊन कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे ही महत्वाची बाब सूस शाखेच्या बाबतीत  वाखाणण्याजोगी आह़े.

पुस्तकातील अभ्यास तर रोजच विद्यार्थी शिकत असतात पण पुस्तका पलीकडे जाऊन अशी शाळाबाह्य स्पर्धेत उतरून टक्कर देणे हे आजकालच्या स्पर्धात्मक जगात अतिशय महत्वाचे आह़े व स्पर्धात्मक जगात टिकून राहून बक्षीस पटकावत आज आत्मविश्वास निर्माण करून स्वतःचे व शाळेचे नाव जपण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणारा अनुभव व अनुभवातून मिळणारा आनंद आज पेरिविंकल च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.  

या संपूर्ण शाळाबाह्य स्पर्धेचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले होते. 

 कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी सर यांचा यात मोलाचा वाटा व सहभाग होता. सुपरवायजर शुभा कुलकर्णी व माधुरी धावडे  यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने सर्व नियोजन करण्यात आले होते.

 

You may have missed