सुसगाव :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सुसगाव येथे मनसे नेते सुहास भगवानराव निम्हण यांच्या वतीने सुरू होत असलेल्या ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राची माहिती घेतली.
“मनसे ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्र” गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांना अखंडित सेवा देत आहे. यासाठी या वर्षी हे केंद्र भव्य अश्या जागेत सुस रस्त्यावरील शिवरत्न लॉन्स शेजारी, सुसगाव या ठिकाणी स्थलांतरित केले असून १५०० गणेश मूर्तींच्या भव्य दालन उभारले आहे. तसेच यावेळेस गणेश मूर्ती घेणाऱ्यांसाठी ३०साड्या व ३ पैठणींचा लकी ड्रॉ घेणार आहे.” : सुहास भगवानराव निम्हण (पुणे शहर उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर/कोथरूड विधानसभा मतदार संघ)
याप्रसंगी मनसेचे रणजित शिरोळे, किशोर शिंदे, सुहास निम्हण, मुळशी तालुकाध्यक्ष धनंजय टेमघरे, मुळशी उपाध्यक्ष गणेश शिंदे, विद्यार्थी सेनेचे अनिल मातेरे, उपविभागाध्यक्ष निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार, अनिकेत मुरकुटे, रमेश उभे, शाखाध्यक्ष जितेंद्र कांबळे, अशोक मराठे, मयूर सूतार, दत्ता रावडे, शिवम दळवी, किरण जाधव, संदीप काळे, रोहिदास चांदेरे, राजेंद्र वेडे, किरण रायकर, शुभम भोसले, मोहन भिलारे, संजय देवकर, अनिल व्हटकर, समीर दहिभाते, सोमनाथ कवडे, हरी दुर्गे, आकाश संसार, बाळा शिंदे, रोहिदास चांदेरे, अनिल नलावडे, महिला हर्षदा नेवसे, मनीषा पसाले परिसरातील मनसे सैनिक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुहास भगवानराव निम्हण, अजय नेवसे, किशोर इंगवले, जय जंगली महाराज प्रतिष्ठान व पाषाणमधील मनसेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केले होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!